मरणानंतर चार खांदे हवेत?, ही कंपनी पूर्ण करतेय शेवटची इच्छा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते… सुरेश भटांच्या या ओळी जगण्याच्या वेदना सांगून जातात. मृत्यू (death) आपल्या आयुष्याचा शेवट. मृत्युनंतर माणसाला लागतंच काय हो!. फक्त योग्य प्रकारे त्यांचे अंत्यसंस्कार केले जावेत असं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाटत असतं. मात्र हल्लीच्या या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात तेही अनेकदा कठीण झालंय याची प्रचिती आपल्याला कोरोना काळात आलीचय. मात्र आता त्यासाठी देखील तुम्ही पैसे देऊन या गोष्टी करु शकता.

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये(Delhi) आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा पार पडला. यावेळी अनेक नवे बिजनेस स्टार्टअप सादर करण्यात आले होते. मात्र यावेळी एक विचित्र आणि वेगळ्या प्रकारचं स्टार्टअप पाहायला मिळालं ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरुये.

सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिडेट ही एक अनोखी कंपनी आहे. मरणानंतरच्या सर्व विधी या कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात येतात. यामध्ये अंत्यसंस्कार(Funeral) करण्यासाठी लागणाऱ्या पुरोहितापासून ते अगदी चार खांदे देणाऱ्या माणसांपर्यंत सर्व सोय ‘सुखांत’कडून केली जाते.

विभक्त कुटुंब पद्धत, परदेशी स्थायिक झालेली मुलं यामुळे अनेकदा एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित मृतांवर योग्यरित्या अंत्यसंस्कारही होत नाहीत. याचीच गरज ओळखून सिनेसृष्टीत अनेक वर्ष काम केल्यानंतर संजय रामगुडे यांना ही कल्पना सुचली. 2014 ला सुखांत कंपनी सुरु करण्यात आली. ही अंत्यसंस्काराचं पॅकेज पुरवणारी कंपनी मुंबई(Mumbai), नवी मुंबई आणि ठाण्यात सध्या कार्यरत आहे. 

सुखांत कडून काही प्री-प्लॅन (Pre-plan) देखील उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पन्नाशी झालेले लोक हा प्री-प्लॅन घेऊ शकतात. यामध्ये त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती मरण पावते तेव्हा त्यांच्यावर अंत्यविधी केले जातात. म्हणजेच, आयुष्यातील चांगल्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ‘सुखांत’कडून सेवा पुरवली जाते.

यावर्षीचा बिझनेस 2022 च्या मेळाव्यात सुखांतला “Outstanding Business Achievement” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. माणसासाठी गाडीची सोय केली जाते. पण गाडीतून कोणी शव घेऊन जात नाहीत. अशा अत्यंत कठीण समयी आम्ही मदतीचा हात देतो. म्हणजेच, जाता-जाता जीवनातील अंतिम क्षणाची चिंताच आम्ही मिटवतो, असं या संस्थेचे संचालक (Director) संजय रामगुडे म्हणतात.

दरम्यान, यावरुन काही सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या जरी लोक या कंपनीकडे जाण्याचा विचार करत नसले तरीदेखील जसा जसा या कंपनीचा प्रचार होईल तसे तसे लोक स्व:तचाच्या खांद्यावरचं ओझ उचलून त्या कंपनीच्या खांद्यावर देतील असं म्हणण्यास काही हरकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या