मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना झटका
मुंबई | ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे (Krushna Hegde) यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
2021 मध्ये कृष्णा हेगडे (Krushna Hegde) यांनी भाजपतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र दोन वर्षांतच त्यांनी शिवबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सोमवारी शिंदे गटात प्रवेश झाला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ,
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.
कृष्णा हेगडे म्हणाले, मी अजून शिवसेना सोडलेली नाही. दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नाही, असं ते म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांनी या अपेक्षा पूर्ण होण्याचं आश्वासन दिलंय. मी आमदार होतो. म्हाडाचा संचालक होतो. अनेक वर्षांपासून काम करतोय, त्यामुळे मी फार काही वेगळं करत नाहीये, अशी प्रतिक्रिया कृष्णा हेगडे यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांच्याकडून हेगडे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली. कृष्णा हेगडे यांचा काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता बाळासाहेंबाची शिवसेना राजकीय प्रवास राहिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘असे कितीही आडवे आले तरी…’; चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर बरसल्या
- भारतातील ब्लड प्रेशर रूग्णांबाबत अभ्यासातून धक्कादायक खुलासा!
- ‘तो’ फक्त माझाच आहे म्हणत पप्पांच्या पऱ्या भिडल्या, व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी! मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांना न्यायालयाकडून दिलासा
- श्रद्धा वालकर प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री?
Comments are closed.