मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांचे धाकटे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयाने आज तीन लाखांच्या वैयक्तिक बॉण्डवर जामीन मंजूर केलाय. हा अनिल देशमुखांसाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.
ऋषिकेश यांच्यातर्फे मुंबई सत्र न्यायालयात सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ईडीतर्फे जामीन अर्ज रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती.
ऋषिकेश यांना जामीन मंजूर झाल्यास त्यांच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच 6 समन्स असूनही हजर राहून त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही, असा आरोप करत त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती ईडीने न्यायालयाकडे केली होती.
ऋषिकेश देशमुख यांच्यातर्फे समन्सवर वैयक्तिक उपस्थिती बंधनकारक नसून, आम्ही तपासात आवश्यक सहकार्य केलं आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून हृषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांना या प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांना त्यानंतरही तुरुंगात रहावं लागत आहे.
ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-