भारतातील ‘इतक्या’ कोट्याधिशांनी सोडला देश; आकडा ऐकून धक्का बसेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लोकसंख्या, प्रदूषण आणि श्रीमंत लोकांची यादी या तीन गोष्टी भारतात प्रचंड वाढताना दिसत आहे. एकीकडे जगात जेव्हा श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली जाते. या यादीत भारतीयांची (Indians) नावं अनेकदा टाॅपवर आल्याचं पहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे तेच श्रीमंत लोक आता भारताला रामराम ठोकून जात असल्याचं दिसत आहे.

हेनले आणि पार्टनर्स (Henley and Partners) यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार यामध्ये तीन देशांचा समावेश आहे.

करोंडपतींचं (Millionaire) आपल्या देशातून पलायन करण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये भारताचा नंबर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर रुस हा देश आहे तर चीन (China) हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला.

बिझनेस इनसाइडरवर (on Business Insider) आधारित हेनले आणि पार्टनर्स यांच्या रिपोर्टनुसार भारतातील अनेक करोडपतींनी 2022 मध्ये दुसऱ्या देशात पलायन(Escape) केलं आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील तब्बल 8000 करोडपतींनी देश सोडला आहे.

रुस (Russia) हा देश पहिल्या क्रमांकावर असून रुस देशातील तब्बल 15,000 करोडपतींनी 2022 मध्ये स्थलांतर केलं आहे. तर चीनमधील 10,000 लोकांनी चीनला टाटा-बाय बाय म्हटलंय. कोराेना काळात या स्थालांतराला ब्रेक लागला होता. त्याने आता पुन्हा जोर धरला आहे.

अनेक करोडपती देश (the country) सोडून जात असले तरीदेखील भारतात करोडपतींच प्रमाण वाढताना दिसतं आहे. असं असलं तरीदेखील रिपोर्टनुसार हे देखील सांगण्यात आलं आहे की, राहणीमान सुधारल्यानंतर देश सोडून गेलेल लोक परत भारतात परतू शकतात.

महत्वाच्या बातम्या