Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर!

मुंबई | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार आहे.

Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यातील दूध उत्पादक संस्थामार्फत ही योजना राबवण्यात येणार असल्याचं विखेंनी सांगितलं आहे.

सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 SNF करीता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणं बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील, असं विखे पाटील म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर रुपये पाच इतके अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल आणि त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील.

Milk Farmers | योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू

योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Ajit Pawar | जयंत पाटलांच्या वक्तव्याने सभागृहात वातावरण पेटलं, अजितदादा उठले अन्…

Lok Sabha Elections 2024 | अभिनेत्री Kangana Ranaut निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ जागांवरुन लढण्याची शक्यता

Jaya Bachchan ने कुटुंबातील ‘या’ व्यक्तीच्या कानाखाली काढला होता जाळ