Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Alert | राज्यात थंडीचा चांगलाच जोर वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीने डोकवर काढलं आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाने काय म्हटलं?

हवामान विभागाने (weather alert) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात थंडी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्या मागचं कारण म्हणजे उत्तर भारतात तापमानाचा पारा खाली घसरल्याने त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रातील वातावरणात होऊ लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात वेगाने घसरण होण्यास सुरुवात झाली आहे.

डिसेंबरमध्ये तापमानात घट

दरम्यान, डिसेंबरच्या महिनाअखेरेस किमान तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शिवाय थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सध्या थंडीची प्रचंड लाट पसरली आहे.

या ठिकाणी तापमानात घट होऊन पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाला आहे. त्याचा परिणाम मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रावर देखील होत आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल असलेले कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर अखेरीस प्रचंड गारठा अनुभवावा लागणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात थंडीचा पारा वाढणार?

मराठवाड्यासह, विर्दभात थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यातील एकूण 11 जिल्ह्यात थंडीचा पारा वाढणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजी नगर बीड, नांदेड, हिंगोली, परभणी अशा एकूण 22 जिल्ह्यात थंडीची लाट पसरणार आहे. यावेळी किमान तापमानसह कमाल तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे.

तर, विदर्भातील चार जिल्ह्यात तापमान 13 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होतं. सर्वाधिक कमी 12 अंश सेल्सिअस इतके तापमान जिल्ह्यात नोंदवलं गेलं आहे.

News Title : weather alert cold increases by December

थोडक्यात बातम्या-

Jaya Bachchan ने कुटुंबातील ‘या’ व्यक्तीच्या कानाखाली काढला होता जाळ

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Rai कडून मोठा खुलासा!

Shahid Kapoor | अभिनेता शाहिद कपूरने घेतली सर्वात महागडी कार; किंमत वाचून थक्क व्हाल

Job Alert | 12 वी पास असणाऱ्यांसाठी ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

…म्हणून Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार?; धक्कादायक कारणं समोर