Jaya Bachchan ने कुटुंबातील ‘या’ व्यक्तीच्या कानाखाली काढला होता जाळ

Jaya Bachchan | गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबातील वाद बाहेर येत आहेत. शिवाय अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांच्या नात्यांबद्दस रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच हे दोघे सुद्धा एकाही कार्यक्रमांना एकत्रीत हजेरी लावत नसल्याने नव्या चर्चेला तोंड मिळत आहे.

एकीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल चर्चा सुरु असताना आता बच्चन कुटुंबातील एक मोठी बातमी समोर आली आहे. बच्चन कुटुंबातील सर्वात संतप्त जया बच्चन यांनी कुटुंबातील एका व्यक्तीच्या कानाखाली लावली होती.

काय आहे नेमका प्रकार?

जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या कानाखाली लावली होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः त्यांची लेक श्वेता बच्चन होती. श्वेताला कानाखाली मारताना दिग्दर्शक करण जोहरने पाहिलं होतं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना करणने याचा खुलासा केला होता.

काय म्हणाला करण?

एका मुलाखतीत बोलत असताना करणने श्वेताला तिच्या आईने म्हणजेच जया बच्चनने कानाखाली मारली होती, असा खळबळजनक खुलासा केला. करण म्हणाला, “एकदा श्वेता माझ्यासोबत मॅगझीन वाचत होती आणि ते नेमकं जया आंटींनी पाहिलं. त्या एवढ्या संतापल्या की त्यांनी श्वेताला माझ्यासमोरच थेट कानाखाली लगावली, असा किस्सा करणने सांगितला.”

जया आणि श्वेता बच्चनमधील नातं-

जया आणि श्वेता बच्चन या दोघीही एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा जया यांनी श्वेताला थेट कानाखाली लगावली होती. जया यांचं म्हणणं न ऐकल्याने श्वेताला मार मिळाला होता.

News Title : jaya bachchan slapped this family member

थोडक्यात बातम्या-

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Rai कडून मोठा खुलासा!

Shahid Kapoor | अभिनेता शाहिद कपूरने घेतली सर्वात महागडी कार; किंमत वाचून थक्क व्हाल

Job Alert | 12 वी पास असणाऱ्यांसाठी ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

…म्हणून Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार ; धक्कादायक कारणं समोर

Chhagan Bhujbal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा धक्का!