‘या’ लोकांना होळीच्या आधी सरकार देणार गिफ्ट, थेट खात्यावर होतील पैसे जमा

नवी दिल्ली | नोकरदार वर्गासाठी भविष्याची तरतूद म्हणजे प्रोव्हिडंट फंड (PF) होय. यामुळेच रिटायरमेटनंतर तुमचं आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. खात्यात जमा झालेले हे पैसे तुम्ही नंतर काढू शकता. आता पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रंगपचंमी(Rangpachanmi), होळी सण जवळ आला आहे. त्याआधीच पीएफ खातेधारकांच्या सरकारी खात्यात होळीपूर्वीच पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफ खातेधारकांची ही होळी आनंदात साजरी होणार आहे. बजेट 2023 सादर होण्यापूर्वी हे पैसे खात्यात जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र ते पैसे होळीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्प 2023 मध्ये पीएफ अ‌ॅगल नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या नंतर खात्यात 2022-23 या अर्थिक वर्षासाठी पैसे जमा होतील. पीएफ व्याज्याच्या संबधी मात्र सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. EPFO खाताधारकांच्या व्याजासंबधी(interest related) अद्याप काही माहिती आली नाही.

दरम्यान, अजून एक मोठ बदल पीएफधारकांसाठी करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2023 पासून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात येणार आहेत. आता तुमच्या खात्याला पॅनकार्ड (Pancard) लिंक न झाल्यास तुम्ही पैसे काढायला गेल्यास 30 टक्क्याऐवजी 20 टक्के टीडीएस (TDS) आकारला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या