कपडे बॅगेत भरून ‘हा’ आमदार एसीबी चौकशीसाठी रवाना!
अमरावती | अमरावतीच्या (Amravati) एसीबीच्या (ACB) कार्यालयात आज चौकशीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हजर होणार आहे. आपल्याला अटक होईल म्हणून या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख पूर्ण तयारी करून रवाना झाले आहेत.
नितीन देशमुख त्यांच्या पत्नीने निघताना त्यांचं औक्षण केलं असून आपल्याला अटक होईल या आशायाने त्यांनी कपड़ेही सोबत घेतले आहेत.
नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे प्रयाण केलं आहे. त्यांनी त्यांच्या सोबत कपडे आणि सामान सामान घेतले आहे. अकोल्यातून जवळपास 700 कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती इथे रवाना झाले आहे.
आज घरून कपडे घेऊन सोबत चाललोय. कारण की, हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत, असा आरोप देशमुख यांनी बोलताना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.