‘या’ बँकेने नवीन वर्षात दिली ग्राहकांना गुड न्यूज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. येत्या नवीन वर्षात आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे.

हा व्याजदर (Interest rate) मुदत ठेंवीवर असणार आहे. ICICI बँकेने जाहीर केलेल्या त्यांच्या अधिकृत बेवसाईटनुसार हा बदल 2 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे. ही वाढ 2 कोटी ते 5 कोंटीच्या मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवर लागू करण्यात आली आहे.

या बदलानंतर आता आयसीआयसीआय बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षात मॅच्युुअर होणाऱ्या एफडीवर (FD) 4.50 टक्के ते 6.75 टक्के व्याज देत आहे. 7.15 टक्के इतका व्याजदर 15 महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या ठेवीसाठी देत आहे.

61 ते 90 दिवसात मॅच्युअर (Mature) होणाऱ्य़ा एफडीवर 5.75 टक्के तर 46 ते 60 दिवसाच्या एफडीवर 5.50 टक्के इतका व्याजदर बँक देत आहे. 2 वर्ष 1 दिवसांपासून ते 3 वर्षाच्या ठेंवीवर 7 टक्के व्याज देत आहे.

271 पासून ते 1 वर्षाच्या कमी कालावधीत तुम्हाला एफडीवर 6.65 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. तसेच तीन वर्ष ते 10 वर्षाच्या एफडीवर 7 टक्के चा व्याज देण्यात येणार असल्याचं बँकेने जाहीर केलं आहे.

16 डिसेंबर 2023 पासून बँकेेचें नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू होणार आहेत. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्क्यांचा व्याजदर देत आहे. आयसीआयसीआय बँकेसोबतच पजांब बँक (Punjab Bank),कर्नाटक बँक(Karnataka Bank), इंडियन ओवरसीज बॅक या बँकांनीसुद्धा त्यांच्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या