‘कालीमातेला दारुचा नैवद्य असतो’, केतकी चितळेचं पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. अनेकदा सोशल मीडियावर ती करत असलेल्या पोस्टमुळे तिला ट्रोल करण्यात येतं. नुकताच पुन्हा एकदा तिच्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

नवीन वर्ष सुरु झाल्याने केतकीने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Forgive but Don’t Forget Happy new year असं तिनं या व्हिडिओत सांगितलं आहे. त्याचबरोबर यावेळी तिच्या हातात वाईनचा ग्लास दिसून आला. यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली होती. यावेळी या कमेंटला उत्तर देताना केतकी चांगलीच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

मी कधी म्हणलं इंग्रजी परंपरा पाळू नका. सोमरस म्हणजे वाईन(wine) . सनातन धर्मात दारु आहे. आमचे देव दारु पितात. काली मातेला दारुचा नैवेद्द दाखवतात. तसेच काही शंकर मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका हे मी लिहते आणि कायम सांगते, असं उत्तर तिन दिलं आहे.

यावर नेटकऱ्याने माघार घेत अतिशय छान माहिती, असा रिप्लाय त्या कमेंटला केला आहे. यामुळेच केतकी सध्या चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या