काय झाडी काय डोंगार म्हणणाऱ्या शाहजीबापू पाटलांनी ‘अशा’ पद्धतीनं केलं तब्बल नऊ किलो वजन कमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील(Shahajibapu Patil) आपल्या राजकीय वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत येत असतात. परंतु यावेळी ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.

शहाजी बापू पाटलांनी केवळ आठ दिवसांत तब्बल नऊ किलो वजन कमी केलं आहे. यामुळं सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली आहे. अनेकजण त्यांनी एवढ्या कमी दिवसांत इतकं वजन कसं कमी केलं, हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

पाटील हे बंगळूर येथील हॅपीनेस कार्यक्रमात 24 डिसेंबरपासून पंचकर्म उपचार घेत होते. त्याचा हा कार्यक्रम श्री रविशंकर यांच्या आश्रमात होता. यावेळी पाटलांसोबत त्यांचे मित्र महेश पाटीलदेखील होते.

पाटील यांचा हा आयुर्वेदीक कार्यक्रम असा होता की, पहाटे पाच वाजता उठायचे त्यानंतर दोन तास व्यायाम, योगासने करायची. या कार्यक्रमात सकाळचा नाश्ता म्हणून उकडलेल्या भाज्या आणि कडधान्ये होती.

दुपारी बौद्धिक ऐकायला असयाचे. दुपारी वाफेवर उकडलेल्या भाज्या आणि चपाती असे पौष्टिक जेवण असायचे. तसेच दुपारचा व्यायाम आणि सुदर्शन प्रक्रिया करावी लागत असे.

या कार्यक्रमात सायंकाळी पुन्हा मेडिटेशन करावे लागत. असा या कार्यक्रमाचा दिनक्रम होता. पाटील या कार्यक्रमात सहभागी होत आपेल नऊ किलो वजन कमी करण्यास यशस्वी ठरले आहेत.

महत्वाच्या बातम्या-