नवीन वर्षात ‘हे’ पाच शेअर्स तुम्हाला बनवतील मालामाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | शेअर मार्केट(Share Market) म्हणजे जोखीम आणि फायदा दोन्हीही आला. त्यामुळे हे नवीन वर्ष अनेकांसाठी नवीन आशा घेऊन आलं आहे. या नवीन वर्षात गुंतवणूकदार त्यांना फायदा करुन देणाऱ्या स्टाॅकच्या शोधात आहेत.

येत्या नवीन वर्षात हे पाच स्टाॅक तुम्हाला मालामाल करुन देतील असा मार्केट तज्ज्ञाचा अंदाज (Market Expert) आहे. यामध्ये आयडीएफसी बँक,रेणुका शुगर,एनसीसी लिमिटेड,रेल विकास निगम लिमिटेड आणि फेडरल बँकेच्या शेअर्सचा समावेश आहे.

आयडीएफसी बँकेच्या (IDFC Bank) शेअर्समध्ये गेल्या वर्षापासून तेजी दिसून येत आहे. 2022 मध्ये हा स्टाॅक 22.36 टक्क्यांनी वाढला होता. मागील तीन महिन्यात या स्टाॅकने 3 टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात तज्ज्ञांनी या स्टाॅकला 100 रुपयांचं टार्गेट प्राईज ग्राह्य धरलं आहे.

रेणुका शेअर्सने (Renuka shares) देखील गेल्या वर्षी चांगलीच प्रगती केली आहे. 90.63 टक्क्यांची उसळी या शेअर्समध्ये पहायला मिळाली आहे. गेल्या पाचवर्षात या स्टाॅकने त्यांच्या गुंतवणुकीदारांना 243 टक्क्यांचा परतावा दिला आहे. येत्या वर्षात 120 रूपयांचा टार्गेट प्राईज तज्ज्ञांनी लक्ष्य केला आहे.

तज्ज्ञांच्या मते एनसीसी लिमिटेड (NCC LIMITED) हा तिसरा स्टाॅक ज्यांने गुंतवणुकदारांना फायदा मिळवून दिला आहे. गेल्या महिन्याभरात या स्टाॅकमध्ये 14.13 टक्क्यांची वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. या स्टाॅकसाठीचं टार्गेट 150 ठेवण्यात आलं आहे.

रेल विकास निगम लिमिटेड या स्टाॅकने मागील वर्षात गुंतवणूकदारांना 247 टक्क्यांचा परतावा दिला. फेडरल बँकेच्या (Federal Bank) स्टाॅकने एका वर्षात 58.54 टक्क्यांची झेप घेतली आहे. फेडरल बँकेच्या स्टाॅकचे टार्गेट 225 असून रेल विकास निगम लिमिटेड या स्टाॅक चे टार्गेट 120 आहे.

महत्त्वाच्या बातम्या