दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | दहावी- बारावीची बोर्डाची परिक्षा (Board Exam) जवळ आली आहे. विद्यार्थ्यांची तयारी सुरु आहे. यातच आता दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फेेब्रुवारीच्या (February) शेवटच्या आठवड्यापासून परीक्षा सुरु होणार आहेत. त्यापूर्वी बोर्डाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक (Secondary and Higher Secondary) शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी-बारावीच्या परिक्षा घेतल्या जातात. आता या परीक्षांसाठी वेळाने पोहचल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही आहे. त्यामुळं इथून पुढे परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहणं गरजेचं बनणार आहे.

यापूर्वी परीक्षा केंद्रावर काही अपवादात्मक कारणांमुळे पोहचण्यास 10 मिनिटं उशीर झाल्यास विद्यार्थ्यांला पेपरला बसण्याची मुफा दिली जात होती. परिक्षामंडळाच्या मते या सवलतीचा विद्यार्थी (Students) गैरफायदा घेत असल्याचं बोर्डाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे परीक्षेला पोहचायला उशीर झाल्यास विद्यार्थ्यांला प्रवेश मिळणार नाही, अशी सूचना परीक्षा मंडळाकडून (Examination Board) देण्यात आली आहे.

21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा असेल. 2 ते 25 मार्चदरम्यान (March) दहावीची परिक्षा असेल. यामध्ये पाच जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 499 विद्यार्थी दहावीच्या बोर्डाची परीक्षा देणार आहेत. बारावीच्या बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 6 हजार 964 आहे.

महत्त्वाच्या बातम्या