पुरुषांनो ‘ही’ मोठी चूक चालणं-फिरणं देखील कठीण करेल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | पुुरुषांच्या (Men) शर्ट आणि पॅंटेला खिसे असतात. त्यामध्ये अनेक पुरुष त्यांचे पाॅकेट पर्स ठेवत असतात. महिलांच्या तुलनेत ती पर्स फारच लहान असते. त्यात मात्र अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. पैसे, कार्ड्स यामुळं ते पाॅकेट पर्स जास्त फुगतं.

अनेक पुरुषांना यामुळे पाॅकेट पर्स (Pocket purse) मागील खिशात ठेवणं थोड योग्य वाटतं. बहुतांश पुरुष त्यांची पाॅकेट पर्स मागील खिशात ठेवतात. ही गोष्टी सर्वसामान्य आहे. तरीदेखील ही सवय पुरुषांना एकेदिवशी चालणं-फिरणं कठीण करुन टाकण्याची शक्यता आहे. यामुळं पुरुष एका गंभीर आजाराचे शिकार होऊ शकतात.

हैदराबादमधील (Hyderabad) एका व्यक्तीला गेल्या तीन महिन्यांपासून नितंब आणि पायाला वेदना होत होत्या. अनेक उपचारांनीदेखील कमी येत नसल्यानं डाॅक्टरांनी पूर्णपणे अभ्यास केला. त्यानंतर त्या व्यक्तीला ‘फॅट वाॅलेट सिड्रोम’ (Fat wallet syndrome) झाल्याचं स्पष्ट झालं.

यामध्ये नितंब(buttock) ते पायापर्यंतच्या नसा दबल्या गेल्या होत्या. त्या कशामुळं दबल्या असतील याचा विचार करत असताना त्या व्यक्तीनं सांगितल की, तो त्याचा पॅन्टेच्या मागच्या खिशात त्याचं वाॅलेट ठेवतो. ऑफीसमध्ये कमीतकमी 10 तास ते वाॅलेट खिशात असतं. ते मागच्या खिशात ठेवून त्याचं काम सुरुच असतं. तेव्हा डाॅक्टरांना समजलं की या व्यक्तीला त्याच्या पर्समुळं फॅट वाॅलेट सिड्रोम झाला आहे.

मागच्या खिशात पर्स ठेवल्यामुळं अर्थात फॅट वाॅलेट सिंड्रोममुळं कधीकधी सायटॅटिक मज्जांततूवर (Sciatic Nerve) थेट दबाव येऊ शकतो. यामुळं रुग्णाला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे, याकारणामुळं फॅट वाॅलेट सिड्रोम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं फॅट वाॅलेट सिंड्रोमपासून वाचायचं असल्यास ती सवय कमी करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या