सुशांतबद्दल कियाराचा आश्चर्यचकित खुलासा, म्हणाली सुुशांत फक्त…

नवी दिल्ली | सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हा एक टॅलेन्टेड अभिनेत्यांपैकी एक होता. शनिवारी सुशांतचा वाढदिवस आहे. याच निमित्तानं अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने देखील सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं सुशांत सोबत एम.एस.धोनी या चित्रपटात काम केलं आहे. सुशांत फक्त दोन तास झोपायचा आणि ती झोप त्याला पुरेशी असायची असा खुलासा कियाराने एका मुलाखतीत केला होता.

मी शुटिंगनंतर प्रचंड थकलेली असायची. मला प्रचंड कंटाळा आलेला असायचा. कधी एकदा झोपते असं मी म्हणायचे. या याबाबतीत त्याचं मत वेगळं होत असं कियारा म्हणाली. तो म्हणायचा “मानवी शरीराला फक्त दोनचं तासांची झोप पुरेशी असते. जेव्हा तुम्ही 7 ते 8 तास झोपता तेव्हा तुम्ही जागेच असता. तुमचा मेंदू 7 ते 8 तासांपैकी 2 तास झोपलेला असतो

सुशांत फक्त 2 तास झोपायचा हे ऐकून मी आश्चर्यचकित व्हायचे. त्याला दोन तास झोप पुरेशी असायची. इतकं असूनही तो सेटवर कधीच दमलेला नसायचा. त्याच्याकडं पाहिल्यावर तो नेहमीच फ्रेश आणि उत्साही दिसायचा. असं कियारानं तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं.

दरम्यान, सुुशांतनं 14 जून 2020 ला आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. आजदेखील त्याचे चाहते या गोष्टीतून बाहेर पडू शकले नाहीत. मध्यंतरी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या