अंबानींची हवा! BGI रँकिंगमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सध्या आशियाचे श्रीमंती उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अंबानी यांच्या मुलाचा साखरपुडा नुकताच पार पडला. अशातच पुन्हा एक आनंदाची बातमी अंबानींना मिळाली आहे. जगातील BGI रॅकिंगमध्ये अंबानींचा दुसरा क्रमांक लागला आहे.

रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये भारतात पहिला आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या रॅकिंगमध्ये अंबानींनी मायक्रोसोफ्टचे(Microsoft) संस्थापक नाडेला आणि गुगलचे (Google) सीईओ पिचाई यांना मागं टाकलं आहे. त्यामुळं अंबानींचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

हा जो निर्देशांक आहे तो फिनेस या ब्रँडद्वारे तयार केला जातो. ब्रँन्ड गार्डियनशिप इंडेक्स (Brand Guardianship Index) ही कंपनीची जागतिक मान्यता आहे. हे इंडेक्स कार्पारेट ब्रँड मूल्यांकन रेखांकित करते. कंपनीमध्ये कार्य करणाऱ्या कंपन्यांच्या सीईओची क्षमता आणि स्तरावरील शेअरधारक मूल्य वाढविण्याची भूमिका पाहिली जाते.

ANI च्या मते ब्रँड फायनान्स इंडेक्समध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 81.7 चा BGI मिळाला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेेचे nvidia jensen आहेत. त्याच्या इंडेक्स 83 आहे. या लिस्ट बाकी भारतीयांचा दबदबा पहायला मिळाला आहे.

या इंडेक्सच्या पहिल्या 10 लोकांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. माय्रकोसाॅफ्टचा सत्या नाडेला या तिसऱ्या क्रमांकावर तर Adobe चे शंतनू चौथ्या क्रमांकावर आहेत. Google चे सीईओ सुंदर पिचाई पाचव्या क्रमांकावर आहेत. महेंद्र समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) 23 व्या क्रमांकावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या