भविष्याची चिंता सोडा; ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर मिळेल पेंशन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | निवृत्तीनंतर अनेकांना इनकम कसं येणार याचं टेंशन येत असतं. तर अनेकजण अशा काही योजनांच्या शोधात असतात ज्या तुम्हाला निवृत्तीनंतर पेंशन मिळवून देतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला अशाच एका खास योजनेची माहिती सांगणार आहोत.

एलआयसीच्या(LIC) न्यू जीवन शांती योजनेत एकदाच पैसे गुंतवून तुम्ही निवृत्तीच्या काळात निश्चित रक्कम मिळवू शकता. म्हणूनच भविष्यात ठराविक वेळेला ठरलेली रक्कम मिळण्यासाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.

नुकतेच या स्किममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही 3 रूपयांपासून ९.७५ रूपये प्रति एक हजार मूल्यावर इंसेंटिव्ह मिळवू शकता. तुमचा इंसेंटिव्ह तुम्ही खरेदी किंमत निवडलेल्या स्थगित कालवाधीवर अवलंबून असणार आहे.

तसेच एलआयसीनं जारी केलेल्या निवेदनात असंही सांगितलंय की, न्यू जीवन शांती संदर्भात अॅन्यूटी रेटमध्ये बदल केला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-