‘पुन्हा जीभ हासडण्याची भाषा कराल तर…’; ‘या’ नेत्याचं ठाकरेंना उत्तर

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) यांच्यावर टीका केलीये.

कालच्या सभेत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगत त्यांनी येथील गद्दारांना याच मातीत गाडणार असल्याचा इशारा कालच्या सभेच दिला होता. याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

खेडमधील उद्धव ठाकरे यांची सभा अलोट गर्दीत झाली असली तरी त्यांची भाषा आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषेचा दर्जा घसरल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

 शंभूराज देसाई यांनी त्यांना थेट इशारा देत त्यांनी पुन्हा अशी भाषा वापरू नये नाही तर जरी एकनाथ शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही सूचना केल्या असल्या तरी आम्ही आता शांत बसणार नाही थेट त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा शंभूराज देसाई यांनी त्यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-