Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राज्याच्या काही भागात गुलाबी थंडी जाणवत असली तरी मात्र काही ठिकाणी पाऊस (Rain) पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (Department of Meteorology) दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडत आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मुंबई (Mumbai) , पुणे (Pune) यासारख्या अन्य राज्यात ढगाळ वातावरण दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार बंगालच्या (Bangal) उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे.

राज्यासह देशातील वातावरण (Climate) बिघडलं आहे. येत्या 24 तासांमध्ये देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. दरम्यान यंदा सुरु असलेल्या पावसाचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार?

राज्याच्या काही ठिकाणी गारपीट तसेच वादळीवाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना (Rabi Crops) फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात आपला कापूस (Cotton) किंवा इतर काही माल ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने (Department Of Agriculture) केले आहे.

यंदाच्या मानसूनमध्ये (Monsoon) पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पडणाऱ्या पावसाचा शेतकऱ्यांना आणि पिकांना फायदा होणार आहे. मात्र सध्या काही जिल्ह्यात (District) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट?

मध्य महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), विदर्भ (Vidharba) , मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागांत हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील फक्त जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. विदर्भातील नागपूर (Nagpur), वर्धा (Vardha) जिल्हा वगळता इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

कोकणातही 25 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट असणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी नाशिक (Nashik), जळगाव, धुळे (Dhule) , नंदुरबार (Nandurbar) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आयएमडीने (IMD) अणखी एक अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे (Thane) आणि पालघरसाठी (Palghar) येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबई येथे पाऊस पडल्यानंतर या शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या 48 तासात राज्याच्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात वादळीवाऱ्यासह, विजांच्या कडकडाटही होण्याची शक्यता आहे.

48 तासात जोरदार पाऊस पडण्याचं नेमकं कारण काय?

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी ऊन, कधी पाऊस असं चित्र पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर (November) महिना जवळजवळ संपत आला असला, तरी थंडी मात्र वाढलेली नाही.

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या (SAFAR) आकडेवारीनुसार, पूर्वेकडील चक्रीवादळ पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. ज्यामुळे तामिळनाडू (TamilNadu) किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल. त्यानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी!

‘धनंजय मुंडे माझ्या कानात म्हणाले की…’; जरांगे पाटलांकडून मोठा खुलासा