Manoj Jarange | मराठा आंदोलनासंदर्भात सर्वांत मोठी बातमी समोर; जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय !

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी लढणारे नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) होय. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे ते कायम चर्चेत आहेत. जरांगे पाटील यांनी आतापर्यंत 35 उपोषणं केली आहेत. मात्र, शिंदे सरकार काहीच ठोस भूमिका घेत नसल्याने त्यांनी लाख मराठा बांधवांसोबत मुंबईला येणार, असे आव्हान दिले होते.

त्यापुर्वीच जरांगे पाटील यांना हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा आदेश देखील देण्यात आला आहे. मात्र, तरी जरांगे यांनी मोठा निर्णय घेत सरकारला घेरण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही जरांगे पाटील पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत.

जरांगे पाटलांचा ताफा मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) लवकरच मुंबईत दखल होणार आहेत. जरांगे यांच्या ठरलेल्या मोर्च्याला 12 ते 14 तास उशीर झाला आहे. त्यामुळे त्यांनी आजच मुंबईला निघण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे.

मराठा आंदोलकांना पोलिसांनी पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, आंदोलक नवीन मार्गावरुनच जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केटमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आंदोलनासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजाराचा फौज फाटा सज्ज झाला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच नाशिकमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिकमध्ये विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शने करण्यास ८ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. आता कोर्टाचे आदेश असताना देखील जरांगे पाटलांचा ताफा मुंबईकडे वळल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जरांगे पाटील यांना हायकोर्टाकडून महत्त्वाचा आदेश

मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मात्र जरांगे पाटील यांना हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा आदेश आला आहे. न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, “सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी”, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. शिवाय आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील यावेळी कळवण्यात यावे”, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

News Title-  Manoj Jarange leaves Mumbai for agitation

महत्त्वाच्या बातम्या –

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता