मनोज जरांगेंना आता थेट ‘या’ पक्षातून ऑफर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी केली आहे. मात्र सरकार ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वैयक्तिक 10 टक्के आरक्षण देत आहे.  मात्र मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) या आरक्षणाचा विरोध करत आहेत. मात्र आता या आरक्षणाला एक वेगळ वळण लागलं आहे. या आरक्षणाला आता राजकीय रंग लागला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी अशी बैठकीमध्ये मागणी केली आहे. बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी अशी बैठकीत मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरवर मनोज जरांगे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना दिलेल्या ऑफरवरून प्रतिक्रिया दिली. “प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणं थोड जड जात आहे. माझं त्यांना आदरपूर्वक म्हणणं आहे की माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. यामुळे सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याकडे आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

जरांगे यांना निवडणुकीसाठी ऑफर

यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना आणखी एका पक्षाकडून निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ऑफर आली आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षातून त्यांना उमेदवार म्हणून ऑफर आली आहे. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. म्हणून जरांगे यांनी निवडणूक लढवावी असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलंय.

काय म्हणाले संदीप जगताप?

राजू शेट्टी यांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं असून रस्त्यावर उतरून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी संसदेमध्ये जात सत्ताधाऱ्यांकडे मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज आणि बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठिशी उभी आहे, असं संदीप जगताप म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीतून जालना मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी दावा केला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारीसाठी दुसरी ऑफर आली आहे.

News Title – Manoj jarange patil Get offer of assembly election

महत्त्वाच्या बातम्या

सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ

‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट!

पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत