सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LPG Price Hike | आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा दणका दिला आहे. देशात एलपीजी सिलेंडरच्या भावात वाढ (LPG Price Hike) झाली असून याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

देशातील ऑईल कंपन्यांनीन आजपासून (1 मार्च) ही दरवाढ लागू केली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कर्मशियल गॅस सिलेंडरची किंमत 25 रुपये, तर मुंबईत ही किंमत 26 रुपयांनी वाढली आहे.

व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम हा खाद्यउद्योगांवर दिसून येतो. त्यामुळे हॉटेलिंग आणि फूड डिलिव्हरीमध्ये दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत देखील वाढ केली जाईल.

एलपीजी सिलेंडरच्या भावात वाढ

त्यामुळे सर्वसामन्यांना जर आता बाहेर जेवायला जायचं असेल, तर त्यांना अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. बाहेरील खाद्यपदार्थांसाठी आता अधिक पैसा मोजावा लागणार आहे. गेल्या तीन महिन्यात सिलेंडरच्या (LPG Price Hike) किमती बदलल्या आहेत. काही वर्षांपुर्वी 500 रुपयांना मिळणाऱ्या सिलेंडरसाठी आता हजार पेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

केंद्राने घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. सबसिडी असलेल्या 14.2 किलोग्रम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.मात्र, व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्या आहेत.
19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या भावात वाढ करण्यात आली आहे.

गॅसच्या नवीन किमती काय?

सध्या दिल्लीत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत (LPG Price Hike) 1755.50 रुपयांहून वाढून 1769.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत 1708 रुपयांहून वाढून 1723 रुपये झाली आहे.

News Title- LPG Price Hike

महत्त्वाच्या बातम्या –

सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ

‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट!

पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत