कोल्हापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर, आता…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahu Maharaj | आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगूल लवकरच वाजणार आहे. यासाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. अशातच कोल्हापूरच्या (Shahu Maharaj) राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मविआचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर या जागेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे याबाबत अजूनच बोललं जात आहे.

श्रीमंत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उतरणार?

कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “राजघराण्यातील किंवा छत्रपती परिवारातील जे कोणी लढतील त्यांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून कोल्हापूरची जागा सोडण्यास तयार आहोत. तसेच त्यांना ज्या चिन्हावर लढायचं असेल त्या चिन्हावर ते लढू शकतात,” असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

नाना पटोले यांच्या या विधानामुळे आता शाहू महाराज (Shahu Maharaj) लोकसभेची ही निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहू महाराज कोल्हापूरच्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत.

मविआकडून श्रीमंत शाहू महाराज यांना तिकीट?

याबद्दल त्यांनी मागे स्वतः संकेतही दिले होते. 27 फेब्रुवारी रोजी शाहू महाराज (Shahu Maharaj) एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येईल. ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल जबाबदारी असेल, असं म्हटलं होतं.

त्यामुळे आता मविआकडून थेट शाहू महाराज मैदानात उतरू शकतात. यावरच कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ यांनी मात्र, जरा वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे याबाबत पुढे काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title- MVA Ready To Give Ticket To Shahu Maharaj Of Kolhapur Loksabha

महत्त्वाच्या बातम्या –

सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ

‘…त्यांचा शब्द डावलणं थोडं जड जातंय’; जरांगे स्पष्टच बोलले

चाणक्यानं सांगून ठेवलंय, ‘या’ पाच जागांवर असेल घर तर होईल बरबादी!

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट!

पंकजा मुंडेंचं एक पाऊल पुढे; भाऊ धनंजय मुंडेही करणार मदत