मनसे- भाजप युतीसमोर शिक्कामोर्तब?, भाजपच्या बड्या नेत्यानं घेतली राज ठाकरेंची भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप(BJP) मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात रंगत असतात.

त्यातच शनिवारी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी(Narayan Rane) मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. राणे-ठाकरेंची ही भेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी झाली. भेटीवेळी राणेंच्या पत्नी नीलम राणेदेखील उपस्थित होत्या.

राणे- ठाकरे भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. तसेच या भेटीदरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली हेही अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता मनसेही या युतीत सामील होऊ शकते, असा अंदाज अनेकजण लावत आहेत.

दरम्यान, राणेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं मनसे-भाजप युतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु अद्याप कोणत्याही राजकीय नेत्यानी यावर स्पष्टपणे खुलासा केला नाही.

महत्वाच्या बातम्या-