अत्यंत धक्कादायक घटना! जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं
पुणे | जादूटोणा करण्याचे प्रकार आलिकडे वाढताना दिसत आहेत. अशातच आपल्या सुनेच्या मासिक पाळीच्या रक्ताचा वापर जादुटोण्यासाठी करण्यात अल्याचं समोर आलं. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला.
पिडीत महिलेनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन वर्षांपुर्वी तिचा प्रेमविवाह झाला होता. तिचं सासर हे बीडचं असून तिच्या सासूने आणि दिराने मिळून तिच्या सोबत हे कृत्य केलं. हा प्रकार ऑगस्ट 2022 मध्ये घडला.
विवाहानंतर पिडीत महिला आपल्या पतीसोबत सासरी गेली असताना तिच्या सासूने आणि दिराने तिच्या मासिक पाळी दिवशी तिला घरात बांधून ठेऊन तिच्या मासिक पाळीचं रक्त कापसानं टिपून एका बाटलीत भरुन मांत्रीकाला विकलं. मात्र हा घाणेरडा प्रकार फक्त पैशांसाठी केला.
हे रक्त 50 हजारात जादूटोण्यासाठी मांत्रिकाला विकलं. पिडित महिला माहेरी विश्रांतवाडी येथे आल्यानंतर हा सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर आई-वडिलांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.
थोडक्यात बातम्या-
पोरीच्या धाडसाला सलाम; आजीसाठी 10 वर्षांची नात चोरासोबत भिडली, पाहा व्हिडीओ
जातीवरून अजित पवार सभागृहात भडकले; सत्ताधाऱ्यांना झापलं
चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ!
Comments are closed.