Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने शुक्रवारी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर केलं, तर दुसरीकडे नुकत्याच गुजरातकडून परत घेतलेल्या हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याची घोषणा केली. सध्या तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया खात्यांना अनफॉलो करुन चाहते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र या सगळ्यात रोहितचा गेम नेमका कसा झाला याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ व्यवस्थापनाला हार्दिक पांड्या पुन्हा आपल्या संघात हवा होता, त्यासाठी त्यांनी हार्दिक पांड्यासोबत बोलणी सुरु केली होती. हार्दिक सुद्धा मुंबई इंडियन्समध्ये परतण्यास तयार होता, मात्र हार्दिकने काही अटी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनापुढे ठेवल्या होत्या आणि त्या अटी मान्य झाल्या तरच आपण परत येऊ, असं सांगितलं होतं.
काय होती हार्दिक पांड्याची सर्वात मोठी अट?-
मुंबई इंडियन्समध्ये परत येण्यास हार्दिकने होकार दिला होता, मात्र मुंबईच्या मालकांना त्याने एक अट घातली होती. जर मला मुंबईचं कर्णधार केलं तरच मी परत येईन, असं त्याने म्हटलं होतं. मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने यासाठी वेळ घेतला मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांना हार्दिक आपल्या संघात हवा होता. अखेर त्यांनी रोहित शर्माच्या कानावर ही बाब घातली.
हार्दिकला संघात आणण्याचा मालकांचा हट्ट कायम होता, मात्र त्यासाठी रोहित शर्माला आपल्या कर्णधारपदाचा बळी द्यावा लागणार होता. अखेर रोहित शर्माने याबद्दलचा निर्णय संघ मालकांच्या हातात सोपवला आणि तो मान्य करणार असल्याचं सांगितलं.
वर्ल्डकपपूर्वीच रोहितला कर्णधारपद गेल्याची कल्पना-
भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या ICC वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघ फायनलपर्यंत एकही सामना हारला नव्हता, मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याच वर्ल्डकपच्या दरम्यान आयपीएलच्या आगामी हंगामात आपण मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसणार असल्याची कल्पना रोहित शर्माला आली होती. संघ व्यवस्थापनाने याच वेळी त्याच्यासोबत बोलणं सुरु केलं होतं.
रोहित शर्मानं कर्णधारपदाचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघ व्यवस्थापनावर सोपवला तसेच हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास देखील त्याने तयारी दर्शवली, त्यानंतरच हार्दिकला गुजरातकडून परत घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला. यासाठी झालेल्या ट्रेडमध्ये मुंबईने गुजरातला तब्बल 15 कोटी रुपये मोजले. त्यामुळे आता हार्दिकची मुंबईच्या कर्णधारपदी झालेली निवड एका रात्रीत झाली नसून त्यामागे फार नाट्यमय घडामोडी असल्याचं समोर आलं आहे.
News Title: mumbai indians Pandya agreed to move from Gujarat to Mumbai on one condition
महत्त्वाच्या बातम्या-
Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, व्हॅगनार कारचा चक्काचुर
Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा
Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!
INDvSA | शमी-चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, कोणीच ओळखत नाही अशा खेळाडूला संधी!
Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल