Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यात धडकी भरवणारा (Pune Accident) अपघात घडला आहे. पुण्यातील सासवड चिल्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वॅगनर कार आणि धान्याने भरलेला ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे.

Pune Accident | पुण्यात धडकी भरवणारा अपघात

अपघात इतका भीषण होता की धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्यानंतर वॅगन-आर कारचा चक्काचुर झाला आहे. चिव्हेवाडी घाटातील वळणाचा अंदाज चालकाला न आल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सासवड-भोर मार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती.

घाटातून धान्य घेऊन जात असताना ट्रक अचानक कारवरती पलटी झाला. त्यामुळं कारमध्ये बसलेल्या दोघांजणांचा मृत्यू झाला आहे.

व्हॅगनार मधील गणेश लेकावळे आणि तृप्ती जगताप यांचा जागीच मृत्यू झालाय तर मागे बसलेल्या ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी या थोडक्यात बचावल्या आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.

Pune Accident | मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक

दुसरीकडे पुण्यात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीस्वार हवेत उडला. त्यानंतर जमिनीवर आदळला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील दुचाकीवरील दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनाली रोकडे एका मेडिकल दुकानात कामाला होती. काम संपल्यानंतर अभिषेक तिला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!

INDvSA | शमी-चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, कोणीच ओळखत नाही अशा खेळाडूला संधी!

Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!