Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठी नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपायला थोडेच दिवस बाकी आहेत. अशात मराठा आरक्षणावर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे.

Bacchu Kadu यांचा सरकारला गंभीर इशारा

सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता केली नाही, तर आम्हाला आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा बच्चू कडू (Bacchu Kadu )यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Bacchu Kadu नेमकं काय म्हणाले?

17 डिसेंबरला जरांगे-पाटील नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत. जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांचा अहवाल सरकारनं दिला नाही. सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर आम्हाला जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं आहे.

जरांगेंचा सरकारला शेवटचा इशारा

दरम्यान, जरांगे-पाटलांनी 17 डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

17 तारखेला मराठा समाजाची अंतरवली सराटी येथे बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढे आंदोलन कसं करायचं? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा