Uddhav Thackeray | ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता’; उद्धव ठाकरे संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लोकांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अदानींसह राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray “तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता?”

देवेंद्र आणि कंपनी म्हणतेय म्हणजे… संजय राऊत यांनी म्हटलंय भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडत आहेत की, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानींचे बूट चाटत आहात ते कशासाठी चाटत आहात?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला.

सरकारचा मध्ये कार्यक्रम चालला होता की, सरकार आपल्या दारी. पण हे सरकार अदानींच्या दारी आहे. आम्ही उतरलो आहोत, धारावीतील सगळ्यांचा एफएसआय, टीडीआर अदानींना देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीय. ढगांची गरजच नाही. बिन ढगांच्या सवलींता एवढा पाऊस पाडलाय की, आणखी ढगांची गरजच नाही, असं ठाकरे म्हणालेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प चर्चेत आहे. अनेक नेते इथे आहेत. अनेक जण या प्रश्नासाठी आवाज उठवत आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, फक्त मुंबईच काय, संपूर्ण महाराष्ट्र आज धारावीत उतरवेल. त्याप्रमाणे फक्त मुंबईतली आपले कार्यकर्ते आज रस्त्यावर आलो आहेत. याचं वर्णन करण्याची गरज नाही. मी माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी हे दृश्य अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“बूट काय असतो धारावीची जनता तुम्हाला दाखवेल”

सूटबूट की सरकार आहे! सूट तुम्हाला आणि बूट आम्हाला असं जर केलंत…तर बूट काय असतो हे धारावीची जनता तुम्हाला दाखवून देईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

मी मुख्यमंत्री असताना एकतरी निर्णय असा सांगा, जो मी माझ्या नागरिकांच्या हिताला बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी घेतला. धारावीचा गळा घोटणारा जीआर आम्ही कधीच काढला नाही. मुंबईवर ज्या ज्या वेळी संकट आलंय, त्या त्या वेळी प्रथम धावून येतो तो शिवसैनिक, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mumbai Indians | असा झाला Rohit Sharmaचा गेम!, समोर आली पडद्यामागची खरी कहाणी

Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!

INDvSA | शमी-चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, कोणीच ओळखत नाही अशा खेळाडूला संधी!