“मुलीने मुलीसोबत लग्न करणं ही कुठली परंपरा”

अमरावती | मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलीनं सोबत लग्न करत आहे, ही कुठली परंपरा, आपल्या संस्कृतीमध्ये कुठून आलं, असं वक्तव्य अमरावतीत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं आहे. त्या अमरावतीमध्ये (Amravati) माध्यमांशी बोलत होत्या.

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जात आहे. सर्वजण आपल्या जोडीदारासोबत हा दिवस साजरा करतात. अशात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) दिवशी मोठं वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मी सुद्धा याच पिढीची आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हे कधी ऐकलं नाही. आई-वडिल मुलांना शिक्षणासाठी पाठवतात आणि मुलं-मुली एकत्र राहतात, असं त्यांनी सांगितलं.

मुलं-मुलासोबत लग्न करत आहे आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे. ही कुठली परंपरा आपल्या संस्कृतीत आली आहे, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थितीत केला आहे.

आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी पाठवतात मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह इन मध्ये राहतात. पैसे जास्त झाले म्हणून डोक्याच्या वर घ्यायचं हे आपली संस्कृती नाही. आई वडील कर्तव्य पार पाडतात त्यामुळे मुलांनी आपलं कर्तव्य पार पडलं पाहिजे, असा सल्लाही नवनीत राणा यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-