भारतीयांना लागलाय ‘या’ विदेशी दारुचा नाद, आकडा ऐकून थक्क व्हाल!

नवी दिल्ली | भारतात मद्यप्रेमींची संख्या काही कमी नाही. दारू कोणी दु:खात पितं, कोणी सुखात, कोणीतरी सहजच कधीतरी म्हणून. तर अनेकदा दारु (Alcohol) पिण्याचे काही फायदे असतात म्हणून देखील दारु पितात. त्यामुळं दारु हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

आपण जी दारु (alcohol) पितो त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. अनेक वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये देखील दारू उपलब्ध आहे. व्हिस्की(whiskey), वोडका(Vodka),बिअर (Beer),शॅम्पेन(Champagne), रम(Rum) असे दारुचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येजण पीत असतो. काही दारूचे प्रकार तर परदेशातून देखील मागवले जातात.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असं समोर आलंय की देशी भारतीयांना विदेशी दारुची आवड लागली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून विदेशी (foreign) मद्याची मागणी झपाट्याने वाढत असल्याची आकडेवारीही याची साक्ष देत आहे.

युकेच्या स्काॅचव्हिस्कीसाठी भारतात सर्वात मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. ब्रिटनच्या स्काॅच व्हिस्कीच्या मागणीत भारचानं फ्रान्सलादेखील मागं टाकलं आहे. स्काॅटलंडच्या वाईन उद्योगातील आघाडीची संस्था स्काॅच व्हिस्ती एसोशिएशन च्या मते गेल्या वर्षी स्काॅच व्हिस्कीच्या 700 मिलीच्या 219 दशलक्ष बाटल्या भारतात आयात केल्या आहेत.

दरम्यान, हा खुलासा कंपनीनं नुकताच केला आहे. यामुळं भारतीयांना व्हिसकी आवडते हे स्पष्ट झालं आहे. SWA चा अंदाज आहे की भारत आणि Uk यांच्यात FTA करार झाल्यास, भारतातील स्कॅाच व्हिस्कीवरील (Scotch whisky) शुल्कावरील भार 150 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळं बाजारात व्हिस्की आणखी स्वस्त होणार आहे, परिणामी यामुळं मागणीदेखील प्रंचड वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या