किचनमधील ‘या’ पदार्थाने सुरु करा बिझनेस; होईल लाखोंची कमाई
नवी दिल्ली | कोरोनानंतर नोकरीतील धोका लक्षात घेत अनेकांनी बिझनेस (business) सुरु केला. अनेकांना आजही बिझनेस करण्याची इच्छा असते. आता अनेक वेगवेगळ्या बिझनेस आयडियांचा (Business Ideas) ते विचार करत असतात. अशीच एक बिझनेस आयडिया तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.
किचनमधील एका छोट्या पदार्थाने बिझनेस सुरु करुन तुम्ही लाखोंची कमाई करु शकता. शेती(agriculture) हा एक सर्वोत्तम बिझनेस पर्याय आहे. ही शेती मात्र ऊस, तांदूळ याची नसून किचनमध्ये लागणाऱ्या जिऱ्याची आहे. किचन मधील हा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. यामुळं तुम्ही चांगली कमाई करु शकता.
जिऱ्याचा (cumin) वापर प्रत्येक घरात केला जातो. फोडणीसाठी, ताकासाठी, अगदी अनेकदा उपवासाच्यावेळीदेखील नुस्ते जिरे घातलेले पदार्थ खातात. त्यामुळं जिरे हा एक महत्त्वाचा पदार्थ बनला आहे. तसेच याची मागणी कधीच कमी होत नाही,त्यामुळं जिऱ्याला गिऱ्हाईक नाही अशी समस्या उद्भवणार नाही.
सध्या बाजारात जिऱ्य़ाचा भाव 200 रुपये प्रतिकिलो इतका आहे. त्यामुळं जिऱ्याची लागवड(Cultivation) फायदेशीर ठरु शकते. हलकी आणि चिकनमाती जमीन जिरे लागवडीसाठी चांगली असते. जमीन स्वच्छ असावी. जिऱ्याचे वेगवेगळे प्रकारदेखील असतात. त्यानुसार तुम्हाला कोणत्या प्रकारची जिरे लागवड करायची आहे याचा अभ्यास करुन लागवड करु शकता.
आता शेती, लागवड आणि वाहतूक या सगळ्यांचा झालेल्या खर्च सोडून आपल्याकडं काही पैसे शिल्लक राहिल्यास या शेतीचा फायदा होईल. जिऱ्याच्या शेतात प्रति हेक्टर 30,000 ते 35,000 रुपयाचा खर्च येतो. जिऱ्याला 200 रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्यास तुम्ही 80,000 ते 90,000 रुपये नफा मिळवू शकता. तुमच्याकडे 5 एकर शेती असेल त्यात तुम्ही जिऱ्याची लागवड केल्यास 4 ते 4.5 लाख कमावू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.