व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात(Gold Rate) सातत्यानं वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु मंगळवारी व्हेलेंटाईन डेच्या(Valentine Day) मुहूर्तावर सोनं स्वस्त झालं आहे.

व्हेलेंटाईन डेच्या दिवशी अनेकजण आपल्या जोडीदाराला सोन्याच्या भेटवस्तू देत असतात. त्यातच सोनं स्वस्त झाल्यानं कपलसाठी ही मोठी खुशखबर आहे.

मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचा दर एक तोळ्यासाठी (10 ग्रॅम) 52,500 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर एक तोळ्यासाठी (10 ग्रॅम) 57, 230 रूपये आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी 10 ग्रॅम चांदीचा जर 700 रूपये आहे. त्यामुळं व्हेलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांदीचेही गिफ्ट देऊ शकता.

दरम्यान, मंगळवारी पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर एक तोळ्यासाठी 57,240 रूपये आहे. तर मुंबईतही 24 कॅरेट सोन्याचा दर एक तोळ्यासाठी 57,240 रूपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या-