वेडच्या कमाईचा लेटेस्ट आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबई | गतवर्षीच्या अखेरीस रिलीज झालेल्या रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलियाच्या(Genelia) ‘वेड’ या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड(Ved) लावलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन कित्येक दिवस उलटले तरी या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.

दिग्दर्शक म्हणून हा रितेशचा पहिला चित्रपट होता तर मराठी चित्रपटात मुख्य भूमिका असणारा जेनेलियाचा हा पहिला चित्रपट होता. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला भरपूर यश मिळाल्याचे दिसत आहे.

वेड या चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत. वेड हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

नुकताच वेडच्या कमाईचा लेटेस्ट आकडा समोर आला आहे. वेडने भारताता आतापर्यंत 60.24 कोटी कमावले आहेत. तर जगभरातून वेडनं 73.50 कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, व्हेलेंटाईन डे निमित्त रितेश जेनेलियाने एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार 13 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर वेड अत्यंत कमी किंमतीत पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-