पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण हे सरकार (Goverment) 72 तासांमध्येच कोसळलं आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आलं. या पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शपथविधी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) चर्चा करूनच झाला होता, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही, असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळाच सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.

शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-