पोहण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | शरीराला व्यायामाची सवय असणं अत्यंत गरजेचं आहे. पोहणं (Swim) हा देखील एक व्यायाम पक्रार मानला जातो. अनेकदा लोक फक्त उन्हाळ्यात पोहायला जात असल्याचं दिसून येतं. मात्र रोज पोहण्याचेदेखील काही अनोखे फायदे आहेत. दिवसातून एक तास पोहणं तुमच्या हाडांवर आणि सांध्यांवर कोणताही परिणाम न करता, कॅलरीज बर्न करतात.

पोहणं हा व्यायाम शरीरासाठी चांगला असल्याचं म्हणलं जातं, मात्र पोहण्याचे मानसिक फायदे देखील आहेत. तुम्ही ताणतणावात असाल किंवा काही मानसिक त्रास तुम्हाला होत असल्यास तुम्ही पोहू शकता. पोहण्यानं ताणतणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते.

हल्ली झोप न लागणं ही मोठी समस्या बनली आहे. याला निद्रानाश म्हणतात. तुुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असल्यास पोहण्यानं हा त्रास कमी होऊ शकतो. यामुळं तुम्ही आनंदी राहाल. तुम्हाला एखाद्या दुखापतीचा त्रास होत असल्यास पोहण्यानं हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

हल्ली हृद्यविकाराच्या समस्या वाढल्या आहेत. पोहण्यामुळं तुम्ही यापासून दूर राहू शकता. पोहल्यामुळं हृद्य आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीता देखील व्यायाम होतो. पोहण्यामुळं हृद्य आणि फुफ्फुसे मजबूत होतात. अस्थमाच्या रुग्णांसाठी देखील पोहणं फायदेशर ठरतं.

वजन कमी करण्यासाठी महागड्या जीमची अजिबात गरज नाही. नियमित पोहत राहिल्यास तुमचं वजन कमी होऊ शकतं. पोहण्यामुळं कॅलरीज बर्न होतात. एका अभ्यासानुसार दररोज 30 मिनिटं पोहल्यानं 440 कॅलरी कमी होतात. त्याचप्रमाणे पोहण्यानं विचार कौशल्य सुधारते.

महत्त्वाच्या बातम्या