‘या’ जोडप्यांसाठी गुडन्यूज; सरकार देणार अडीच लाख

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| प्रेमाचा शेवट म्हणजे लग्न असं आपल्याकडं समजलं जातं. मात्र आपल्याकडं प्रेमयुगुलांचं एकमेकांशी लग्न होण्याचं खूप कमी प्रमाण आहे. आजही आपल्याकडं जातीभेद मानला जातो. त्यामुळं इतर जातीतील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यास चुकीचं समजलं जातं. अनेकदा त्या जोडप्याला वाळीत टाकलं जातं.

त्यामुळं अनेकदा जातीबाह्य विवाह करण्यास टाळलं जातं. यामुळं पुन्हा समाजात जातीभेदाला खतपाणी मिळतं. तेच बंद करण्यासाठी राज्य सरकारनं एक नवी योजना आणली आहे. ज्य़ामुळं हा समाजातील जातीभेद कमी होईल आणि नव्या जोडप्याच्या संसारालादेखील हातभार लागेल.

आता राज्य सरकार आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला 2.50 लाखांपर्यंत पैसे देत आहे. जर एखादी व्यक्ती जनरल कॅटेगरीतील असेल आणि त्या व्यक्तीने इतर समुदायातील मुलगी अथवा मुलाशी लग्न केल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या जोडप्याकडं लग्नाचे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. या योजनचा लाभ तेच लोक घेऊ शकतात ज्यांनी एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये लग्न केलं आहे. त्यासाठी तुमच्याकडं मॅरेज सर्टिफिकेटसह जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुमचं हे लग्न पहिलं लग्न असावं.

यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील खासदार किंवा आमदाराकडे या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. तो अर्ज पुढं डाॅ. आंबेडकर फाउंडेशनकडं पाठवला जाईल. तसेच तुमच्या दोघांचं अर्थात पती-पत्नीचं बँकेत जाॅइंट अकाउंट असणं अनिवार्य आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर पती-पत्नीच्या खात्यात 1.50 जमा होतात आणि 1 लाखाची एफडी दिली जाते.

महत्त्वाच्या बातम्या