शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी (Farmers) नवनवीन योजना घेऊन येत असतं. नुकताच सादर झालेल्या बजेटमध्येदेखील शेतीला प्रोत्साहन देणारे अनेक निर्णय घेण्यात आलं असल्याचं पहायला मिळालं. देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजना राबवण्यात येतात.

अशीच एक योजना राजस्थानमधील (Rajasthan) शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. नीलगाय आणि भटक्या प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी,राजस्थान सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण योजना (Crop Protection Scheme) राबवत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेताला कुंपण घालण्यासाठी भरघोस अनुदान दिले जात आहे.

नुकताच सादऱ झालेल्या 2023 अर्थसंकल्पात राजस्थानसरकारनं 70 टक्के अनुदान (grant) देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना कुंपण बांधण्यासाठी मिळणार आहे. यापूर्वी हे अनुदान 50 टक्के होतं. यासाठी राजस्थान सरकार 200 करोड रुपये खर्च करणार आहे.

राजस्थान सरकारनं कुंपण योजनेत वाढ केली आहे. त्याचप्रमाणे मिळणाऱ्या अनुदानातदेखील वाढ करण्यात आली आहे. या कुंपण योजनेचा लाभ जवळपास 1 लाख शेतकरी घेऊ शकतील. या अनुदानाअतंर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती कुंपण (the fence) घालण्यासाठी फक्त 30 टक्के खर्च करावा लागेल. उर्वरित रक्कम सरकारकडून मिळेल.

या कुंपण योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतात 400 रनिंग मीटरपर्यंतचं कुंपण घालू शकता. या योजनेअंतर्गत गटात किमान 10 किवा त्यापेक्षा जास्त शेतकरी असावेत. हे अनुदान 5 हेक्टर जमिनीवर कुंपण घालण्यासाठी दिले जाणार आहे. या अनुदानाची अधिक माहिती राज्यसरकराच्या अधिकृतबेवसाईटवर उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या