व्हेलेंटाईन डे निमित्त खास पोस्ट करत प्राजक्तानं सांगूनच टाकलं लव्ह लाईफबद्दल

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळीनं(Prajakta Mali) आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. याच चाहत्यांसोबत ती सोशल मीडीयाच्या माध्यमातून जोडलेली आहे.

प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडते. त्यातली त्यात प्राजक्ता कोणाला डेट करते का?, हे जाणून घेण्यास तर चाहते नेहमीच उत्सुक असतात.

आता याच चाहत्यांना प्राजक्तानं व्हेलेंटाईन डे(Velentine Day) निमित्तानं एक खास पोस्ट करत उत्तर दिलं आहे. प्राजक्तानं इंस्टाग्रामवर लाल रंगातील साडीवरील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना तिनं कॅप्शन दिलं आहे की, अखिल भारतीय सिंगल संघटेनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही, मीही तुमच्यात सहभागी आहे. आता प्राजक्ताच्या या कॅप्शनवरून तर प्राजक्ता सिंगल आहे, असंच दिसत आहे.

दरम्यान, प्राजक्ताला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की, तू शेवटचं डेट कधी केलं आहे?. यावर प्राजक्ता म्हणाली होती, मी शेवटचं डेट साडेचार वर्षांपूर्वी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-