राष्ट्रवादीचा शिंदे-भाजपला जोर का झटका!

सातारा | सातारा जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत (Gram Panchayat Election Result) सत्तांतर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 12 पैकी 12 जागांवर विजय मिळवत भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिला.

दुसरीकडे चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून 10 जागांवर पक्षाने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. तर विरोधी गटाला 3 जागांवर समाधान मानावं लागलंय.

सरपंचपदी देवदत्त माने हे बहुमताने निवडून आले आहे. दुसरीकडे कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभुराजे देसाई आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे.

विरोधी राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या असून सरपंचपदावर राष्ट्रवादी गटाने 2 मतांनी विजय मिळवला आहे. शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आहे.

कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More