“पुढच्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो”

मुंबई| शिंदेंच्या बंडापासून राजकीय वातवरण चांगलेच तापलेलं दिसून येत आहे. राजकीय पक्ष(Political Parties) सातत्यानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नुकतेच बावनकुळे यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत 52 आमदार निवडून आणण्याचा दावा केला आहे. पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसलेलं पाहायचं असेल तर त्यांच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहीलं पाहीजे, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याला उत्तर देत त्यांना टोला लगावला आहे.

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना बच्चू कडू(Bacchu Kadu) म्हणाले की, बावनकुळे यांचे आडनाव बावनकुळे आहे, त्यामुळं त्यांनी 52 आकडा सांगितला असेल. विदर्भातून आमचे 10 आमदार आम्ही काही करून निवडून आणू.

भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नाही. जर तरच्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. येणारी परिस्थीती कशी असेल त्यावर सगळं अवलंबून असतं, असंही बच्चू कडू म्हणाले.

पुढच्या काळात जर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) मुख्यमंत्री होऊ शकतात तर एकनाथ शिंदेही(Eknath Shinde) होऊ शकतात. प्रहारचादेखील मुख्यमंत्री होऊ शकतो, आम्ही असंही म्हणू शकतो, असा टोलाही बच्चू कडूंनी बावनकुळेंना यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या-