“लिहून घ्या… महाराष्ट्रात नंबर वन भाजपच राहील”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच बाजी मारणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना फडणवीसांनी भाजपाचा विजय होईल असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मागच्या वेळेस आम्ही सांगितलेलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या. त्यांनी विचारलेलं कशावरुन आल्या? आमच्या बावनकुळेंनी नावासहीत यादी घोषित केली. तसेच त्या ठिकाणींहून आम्ही भाजपाचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत असंही सांगितलं. त्यामुळे काही काळजी करु नका, पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-