दोस्त दोस्त ना राहा; काँग्रेसचा ठाकरेंना धक्का
मुंबई | राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास जवळपास 667 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 167 ग्राम पंचायती मिळवत भाजपने (BJP) राज्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताब्यात 122 ग्राम पंचायती आल्याचं दिसून येतंय.
राज्यातील एका ग्रामपंतायतीत मात्र (Grampanchayat Result) वेगळीच आघाडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या निकालाची आता महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.
नांदेडच्या चिमेगावात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती. या ग्राम पंचायतीचा निकाल हाती आला असून काँग्रेसचा सरपंच निवडून आला आहे. तर ग्राम पंचायतवर शिंदे-काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
शिंदे गटाने काँग्रेसशी सलगी करून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. या विचित्र आघाडीचीच अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.
दरम्यान, 7,751 ग्रामपंचयातींपैकी 590 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 252 ग्राम पंचायतींवर शिंदे-भाजप गटाचा, 227 ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीच्या पॅनलचा बिनविरोध विजय झालाय.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.