मुंबई | शिवसेना(ShivSena) हे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी चागंलाच जोर धरला आहे. यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वी गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं. त्याच पत्रामुळं आता वातावरण तापल्याचं दिसून येत आहे.
सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. याचसंबधी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात राऊतांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना मारण्याचा कट केला जात असून तो शिंदे गटातील नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता.
या पत्रानंतर राजकारण जास्तच तापल्याचं पहायला मिळालं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे, ही राऊतांची स्टंटबाजी असल्याचा आरोप शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. आमदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊतांनी थेट आरोप केल्यामुळं वातावरण तापलं आहे.
यामुळेच माजी खासदार निलेश राणे (BJP MLA Nilesh Rane) यांनी एक ट्विट केलं आहे. संज्याची इतकी फाटली की आज आवाजाचा व्हाॅल्य़ुम एकदम कमी झाला, कसलाही पुरावा न देता संज्याला वाटलं की त्याच्यावर हल्ला होणार आहे, कदाचित स्वप्नात आलं असावं. संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार, त्यासाठी वेगळी तयारी करावी लागणार नाही. असं ट्विट राणेंनी केलं आहे.
दरम्यान, राऊतांनी केलेल्या या आरोपामुळं अनेक लोक आक्रमक झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. राऊतांनी पत्रात दिल्याप्रमाणे त्यांची सुपारी राजा ठाकूर याला श्रीकांत शिंदेनी दिली असल्याचा उल्लेख केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या