ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदेंची मोठी खेळी

मुंबई | निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) सध्या मोठा धक्का बसला आहे. यातच शिंदेंनी आता विधीमंडळातील कार्यालयाचा ताबा मिळाल्यानंतर आता शिंदे गटानं आपला मोर्चा संसदेच्या विधीमंडळाच्या कार्यालयाकडं वळवला आहे.

यामुळे ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्याचं काम शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव वापरण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. दुसरीकडे 28 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे.

या अर्थसंकल्पात ठाकरे गटाला कशाप्रकारे अडचणीत आणता येईल हा विचार शिंदे गट करत आहे. यासाठी शिंदे गट अपक्ष आमदारांची साथ घेणार आहेत. विधानसभेत असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप(Whip) बजावण्यासाठी शिंदे गटाला कारण हवं आहे.

यासाठी शिंदे गट अपक्ष आमदारांची साथ घेण्याचं ठरवलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चर्चा पूर्ण झाल्यावर कपात मांडण्यात येते. त्यानंतर सत्ताधारी पक्ष सरकार विरोधात तर विरोधी पक्ष सरकारच्या बाजून मत देण्याचा व्हिप बजावतात. यावेळी अपक्षाची बाजू महत्त्वाची असते.

ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे गटातील व्हिप पाळणं महत्त्वाचं आहे तो व्हिप न पाळल्यास ठाकरेंच्या शिवसेनेवर व्हिप न पाळल्याचं कारण सांगत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे ही खेळी शिंदे गटानं केली आहे. यामुळं ठाकरेंच्या आमदारांना अडचणीत आणता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या