राजधानी दिल्लीत मोठी घडामोड; आणखी एक गोष्ट ठाकरेंच्या हातून निसटली
मुंबई | शिवसेना(ShivSena) हे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी चागंलाच जोर धरला आहे. अनेकजण शिवसेनेला टोला लगावत आहे तर दुसरीकडं या निर्णयामुळे धक्क्यात असणारी शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
आता धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाचं नाव मिळवल्यानंतर शिंदे गटानं मुंबईतील विधीमंडळाच्या शिवसेना कार्यालयाचा ताबा हाती घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. 27 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधींमंडळातील कार्यालय हाती घेत आहोत असं सांगण्यात आलं होतं.
विधीमंडळातील कार्यालयाचा ताबा मिळाल्यानंतर आता शिंदे गटानं आपला मोर्चा संसदेच्या विधीमंडळाच्या कार्यालयाकडं वळवला आहे. संसदेतील विधीमंडळाचं कार्यालय मिळावं यासाठी शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केंद्रीय सचिवालयाला पत्र दिलं होतं.
दरम्यान, शिंदे गटात फूट पडल्यानंतर शिंदे गटासाठी मागील अधिवेशनावेळी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळं शिंदे गटानं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. यामुळं आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी बसायचं कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.