शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई | शिंदे गट (Eknath Shinde) ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. ठाकरे गटाच्या महिला नेत्याने मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

ठाकरे गटातील 40 ते 50 नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते लवकरच शिंदे गटात सामील होतील, असा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे.

लोकसभा पातळीवर बैठकाही घेण्याचं काम सुरू झालं आहे. इतकंच नव्हे तर इतर पक्षाचे नगरसेवकही गळाला लागतील, असंही शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी सांगितलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धोबीपछाड देण्यासाठी शिंदे गटाने मास्टर प्लान तयार केल्याचं बोललं जात आहे.

ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिंदे गटाकडून अनेक कुरापती केल्या जात असल्याच्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल काय बोलणार?, असं शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-