आता काय बोलाव! ‘ही’ कंपनी तुम्हाला देतीय गांजा फुकायचे 88 लाख

नवी दिल्ली | बेरोजगारीचं प्रमाण वाढतयं यामुळे तरुणाईच्या व्यसनाचं (Addiction)प्रमाण देखील वाढत चाललं आहे. हल्लीच्या तरुणाईला गांजा(Marijuana), सिगरेट, दारु यांसारख्या गोष्टीचं व्यसन म्हणजे फॅशन वाटायला लागते. त्यासाठी ते त्यांचा पैसा आणि आरोग्य दोन्ही वाया घालवत असतात. आता मात्र व्यसन करणं हे देखील वरदान ठरणार आहे.

अनेक तरुण-तरुणी सध्या बेरोजगार (unemployed) आहेत. नोकरी नसल्याच्या टेन्शनमुळं त्यांनी व्यसनाची वाट धरली आहे. त्यांच्यासाठी आता या दोन्ही समस्येचं निराकरण होणार आहे. आता गांजा फुकण्यासाठी एक कंपनी तुम्हाला वर्षाला तब्बल 88 लाखाचं पॅकेज देत आहे.

जर्मनमधील एका कंपनीत ‘Cannabis Sommelier’ पदासाठी जागा निघल्या आहेत. ही एक विड (Wid) कंपनी आहे. सध्या कंपनीला त्यांच्या एका प्रोडक्ट टेस्टींगसाठी प्रोफेशनल स्मोकर ची गरज आहे. यासाठी ही कंपनी कर्मचाऱ्यांना 88 हजार पौंड म्हणजे सुमारे 88 लाख रुपये पगार देत आहे.

या पदासाठी काम करताना तुम्हाल अनुभव असणंदेखील गरजेचं आहे. वीड एक्सपर्ट या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला याचा वास आणि गांडा ओढल्यानंतर आलेला अनुभव याचं निरीक्षण करावं लागणार आहे. यासाठीत ही कंपनी योग्यप्रकारे धुम्रपान करु शकतील अशा लोकांचा शोध घेत आहे.

कॅनामेडिकल जर्मन फार्मसीमध्ये औषधी भांग अर्थात औषधी गांजा विकला जातो. याच प्रोडक्टच्या टेस्टींगसाठी कंपनी वीड एक्स्पर्ट हे पद भरत आहे. या पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडं गांजा ओढण्याचा परवाना असणं गरजेचं आहे. दरम्यान, कंपनीची जाहिरात निघाल्यानंतर असंख्य लोकांनी अर्ज पाठवलं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More