मोठी बातमी! विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | शिवसेना हे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ( CM Eknath Shinde) गटाला मिळालं आहे. या निर्णयामुळं पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांनी चागंलाच जोर धरला आहे. अनेकजण शिवसेनेला टोला लगावत आहेत,तर दुसरीकडं या निर्णयामुळे धक्क्यात असणारी शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

अशातच शिवसेना भवन आणि कार्यालय (office) आता कोणाकडं जाणार ही चर्चा सुरु होती. आता धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाचं नाव मिळवल्यानंतर शिंदे गटानं मुंबईतील विधीमंडळाच्या शिवसेना कार्यालयाचा ताबा हाती घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) 27 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आम्ही विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेत आहोत, यापुढील जे काही निर्णय असतील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली, अशी प्रतिक्रिया भरत गोगवले यांनी दिली आहे.

दरम्यान, शिंदे गटात फूट पडल्यानंतर शिंदे गटासाठी मागील अधिवेशनावेळी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळं शिंदे गटानं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. यामुळं आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी बसायचं कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या